आई मराठी कविता:-
मिळाली तरी नाही कळली, अशी कशी आई । ।
जिची सावली प्रकाश होई , अशी कशी आई । ।
जन्म देऊनि बाळाला जन्मते जगते आई । ।
अश्रुंचाही करुनि पान्हा प्रेम पाजते आई । ।
आई खरी जाणवते तेव्हा जेव्हा नसते आई ।।
आशीर्वाद रूपे कवेत सदैव ठेवते आई ।।
मन मौनाची भाषा माझी समजते आई ।।
काळीज आपले पांघरुनी मजला जपते आई ।।
नक्षत्रनक्षीचे महावस्त्र नको गनं मजला आई ।।
नाही सर तुझ्या पदारची कशालीहि आई ।।
कधीच कुणा न सुटले कोडे अशी कशी आई ।।
वेडी माया प्रेम वेडे अशीच असते आई ।।
- डॉ योगीन्द्रसिंह जोशी
मिळाली तरी नाही कळली, अशी कशी आई । ।
जिची सावली प्रकाश होई , अशी कशी आई । ।
जन्म देऊनि बाळाला जन्मते जगते आई । ।
अश्रुंचाही करुनि पान्हा प्रेम पाजते आई । ।
आई खरी जाणवते तेव्हा जेव्हा नसते आई ।।
आशीर्वाद रूपे कवेत सदैव ठेवते आई ।।
मन मौनाची भाषा माझी समजते आई ।।
काळीज आपले पांघरुनी मजला जपते आई ।।
नक्षत्रनक्षीचे महावस्त्र नको गनं मजला आई ।।
नाही सर तुझ्या पदारची कशालीहि आई ।।
कधीच कुणा न सुटले कोडे अशी कशी आई ।।
वेडी माया प्रेम वेडे अशीच असते आई ।।
- डॉ योगीन्द्रसिंह जोशी
No comments:
Post a Comment